दमदार फीचर्स असलेली Kia Sonet Facelift 2024 भारतात लाँच, किंमत 7.99 लाख!

WhatsApp Group

दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia ने आज आपली प्रसिद्ध कॉम्पॅक्ट SUV किआ सोनेट फेसलिफ्ट (Kia Sonet Facelift 2024 In Marathi) भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. आकर्षक लूक, उत्तम फीचर्स आणि ADAS तंत्रज्ञानाने सुसज्ज, या SUV ची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह येणारी, ही SUV एकूण 19 व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यात 25 सेफ्टी फीचर्स, 70 कनेक्टेड फीचर्स आणि 15 हाय सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत.

नवीन सोनेट सध्याच्या मॉडेल सारखीच आहे. सर्वात मोठा बदल त्याच्या मोठ्या एलईडी हेडलॅम्प्स आणि डेटाइम रनिंग लाइट्स (DRL’s) मध्ये दिसून येतो. याशिवाय, फ्रंट बंपर आणि स्किड प्लेट्सचीही पुनर्रचना करण्यात आली आहे, त्यात हॉरिझॉन्टल माउंटेड एलईडी फॉग लाइट्स देण्यात आले आहेत. कंपनीने यामध्ये 16 इंची नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स समाविष्ट केले आहेत.

कंपनीने नवीन सोनेट फेसलिफ्टच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणेच याला तीन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह ऑफर करण्यात आली आहे. त्याचे 1.2 लिटर, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन 83hp ची पॉवर जनरेट करते जे केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

हेही वाचा – एथरची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 20,000 हजार रुपयांनी कमी किमतीत मिळणार!

दुसरा पर्याय म्हणून, 1.0 लिटर, 3 सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे जे 120Hp पॉवर जनरेट करते आणि तिसरा पर्याय म्हणून, 1.5 लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन उपलब्ध आहे जे 116Hp पॉवर जनरेट करते. टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि iMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. याशिवाय, हे दोन्ही इंजिन 7-स्पीड ड्युअल क्लच आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक पर्यायासह देखील येतात.

सेफ्टी

सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एसयूव्ही खूपच चांगली बनवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हे भारतीय रस्त्यांवरील सर्वात सुरक्षित एसयूव्ही गाड्यांपैकी एक आहे. यामध्ये कंपनीने 6 एअरबॅग्जचा मानक म्हणून समावेश केला आहे. याशिवाय, हिल-स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

याशिवाय, कंपनीने कॉर्नरिंग लॅम्प, फोर-वे पॉवर ड्रायव्हर सीट, 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड-व्ह्यू मिरर यासारखे फीचर्स त्याच्या हाय व्हेरिएंटमध्ये दिले आहेत. या SUV मध्ये कूल्ड फ्रंट सीट, लेदर अपहोल्स्ट्री, BOSE ऑडिओ सिस्टम, सनरूफ, LED अॅम्बियंट लाइटिंग सारख्या सुविधा देखील आहेत.

Leave a Comment