बुलेटला टक्कर देण्यासाठी नवीन Jawa 350 लाँच, वाचा स्पेसिफिकेशन, किंमत

WhatsApp Group

बाईक मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 ला टक्कर देण्यासाठी जावा येझडी मोटरसायकलने एक खास आणि नवीन बाईक लाँच केली आहे. कंपनीने Jawa 350 नवीन अवतारासह लाँच केली. ही बाईक Royal Enfield Classic 350 ला टक्कर देईल. या दोन्ही बाईक 350 सीसी सेगमेंटमध्ये येतात. जावाने आपल्या नवीन बाईक मध्ये काही खास फीचर्स दिले आहेत. याशिवाय, कंपनीने बाईक मध्ये अपडेटेड चेसिस, पॉवर आणि टॉर्क देखील जारी केला आहे. कंपनीने ही बाईक तीन नवीन रंगात लाँच केली आहे.

3 रंगांमध्ये उपलब्ध

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही बाईक मरून, ब्लॅक आणि मिस्टिक ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध असेल. या बाईकची सुरुवातीची किंमत 2.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या बाईक चा ग्राउंड क्लीयरन्स 178 मिमी आहे. कंपनीने समोर 280 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 240 mm डिस्क ब्रेक दिले आहेत. याशिवाय बाईक मध्ये ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आला आहे.

कंपनीने या बाईक मध्ये 334 सीसी पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 7000 rpm वर 16.6 kw ची कमाल पॉवर जनरेट करते. याशिवाय, हे इंजिन जास्तीत जास्त 28.1 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड इंजिन आहे. याशिवाय ट्विन एक्झॉस्टही उपलब्ध आहे.

हेही वाचा – 31 जानेवारीनंतर FASTag काम करणार नाही!

इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले, तर बाईकचे वजन 194 किलो आहे. याशिवाय, बाईकची इंधन टाकी क्षमता 13.2 लीटर आहे. बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशन आहे. कंपनीने या बाईकमध्ये असिस्ट आणि स्लिप क्लच दिले आहेत.

Leave a Comment