फक्त 5 किलो वजनाची जगातील सर्वात महागडी सायकल! किंमत ऐकाल तर…

WhatsApp Group

सुपर बाइक्स आणि सुपर कारच्या या जगात सायकलही सुपर व्हायला हवी होती. आज बाजारात तुम्हाला प्रगत तंत्रज्ञान असलेल्या अनेक सायकली दिसतील. त्यांची किंमतही हजारो रुपयांच्या घरात आहे. पण, आज आपण ज्या सायकलबद्दल बोलत आहोत ती त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत (World Most Expensive Cycle) या दोन्ही बाबतीत भारी आहे. ही सायकल बुगाटी या सुपर आणि लक्झरी कार बनवणाऱ्या कंपनीने तयार केली आहे.

फ्रेंच सुपर कार ब्रँड बुगाटीने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शो, 2017 मध्ये ही सायकल सादर केली. पीजी बुगाटी बाईक (PG Bugatti Bike) या नावाने लाँच करण्यात आलेली ही सायकल बुगाटीच्या 1,500 हॉर्स पॉवर सुपर कार शिरॉनपासून (Chiron) प्रेरित आहे. या कारची स्टाईल सायकलमध्ये देण्यात आली आहे. या सायकलच्या फीचर्सबद्दल तुम्हाला जितके आश्चर्य वाटेल तितकी किंमत ऐकून तुम्हाला जास्त आश्चर्य वाटेल.

या बाईकची किंमत पाहिली 39 हजार डॉलर्स (सुमारे 32 लाख रुपये) आहे. सुपर कारची हुबेहूब नक्कल करून ही सायकल तयार करण्यात आली आहे. ही सायकल इतकी महाग असण्याचे पहिले कारण म्हणजे ती बुगाटीने बनवली आहे, जो एक प्रीमियम ब्रँड आहे. याशिवाय सायकलची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानही तिला खास बनवतात. पहिली गोष्ट म्हणजे कंपनीने बाजारात फक्त त्याच्या 667 सायकल बनवल्या.

या सायकलमध्ये वापरलेले साहित्य टॉप स्पोर्ट्स कारमध्ये वापरले जाते. नासा आपल्या अंतराळ मोहिमांमध्ये वापरत असलेली सामग्री देखील या सायकलमध्ये वापरली गेली आहे. ही सायकल 95 टक्के अतिशय मजबूत कार्बन फायबरपासून बनलेली आहे. तिचे वजनही केवळ 5 किलो आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात हलकी सायकल आहे. सीट, हँडलसह इतर सर्व भाग देखील कार्बन फायबरचे बनलेले आहेत. या सायकलमध्ये रंग बदलण्याचाही पर्याय आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एखादे बटण दाबताच त्याचा रंग बदलेल.

हेही वाचा – हिवाळ्यात कारचा AC वापरावा की नाही? जाणून घ्या फायदे!

ही सायकल फिक्स्ड गियर बेल्ट ड्राईव्हच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यामध्ये व्हर्टिकल शॉक ॲब्सॉर्बिंग बार आणि लेदर शीटचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये साखळीऐवजी सिंगल स्पीड, सिंगल व्हील ब्रेक आणि बेल्ट ड्रिवन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्याची कार्बन फ्रेम त्याच इंजिनीयर्सनी तयार केली आहे जे फॉर्म्युला वन कार बनवतात. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही सायकल सार्वजनिक रस्त्यावर फिरण्यासाठी तयार केलेली नाही.

Leave a Comment