Tata Tiago and Tigor iCNG AMT Launched : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आज देशांतर्गत बाजारात असे काही केले आहे, जे आजपर्यंत इतर कोणत्याही कार उत्पादकाने केले नाही. टाटा मोटर्सने देशातील पहिली ऑटोमॅटिक CNG कार रेंज विक्रीसाठी लाँच केली आहे.
कंपनीने आपली सर्वात स्वस्त हॅचबॅक Tiago CNG AMT आणि स्वस्त सेडान कार Tigor CNG AMT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह लाँच केली आहे. या नवीन CNG ऑटोमॅटिक रेंजची सुरुवातीची किंमत फक्त 7.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
Tiago iCNG AMT च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 7,89,900 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने ही हॅचबॅक एकूण चार ट्रिममध्ये सादर केली आहे, त्याच्या टॉप XZA NRG ट्रिमची किंमत 8,79,900 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर टिगोर iCNG AMT ऑटोमॅटिक फक्त दोन ट्रिममध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 8,84,900 रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 9,54,900 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा – तुम्हाला लाइट फूट ड्रायव्हिंग माहितीये, ज्यामुळे कारचे मायलेज वाढते?
Tiago iCNG AMT व्हेरिएंटनुसार किंमत
XTA 7,89,900/-
XZA+ 8,79,900/-
XZA+ DT 8,89,900/-
XZA NRG 8,79,900/-
Tigor iCNG AMT व्हेरिएंटनुसार किंमत
XZA 8,84,900/-
XZA+ 9,54,900/-
अप्रतिम मायलेज
टाटा मोटर्सचा दावा आहे की या ऑटोमॅटिक सीएनजी कार 28.06 किमी/किलो पर्यंत मायलेज देतात. सध्याच्या रंग पर्यायांव्यतिरिक्त, कंपनीने काही नवीन रंग, टाटा टियागोसाठी टोर्नाडो ब्लू, टियागो एनआरजीसाठी ग्रासलँड बेज आणि रेग्युलर टिगोरसाठी मेट्योर ब्राँझ रंगाचा पर्याय देखील समाविष्ट केला आहे.