MINI Cooper Convertible India : भारतामध्ये MINI Cooper Convertible ची बुकिंग्स अधिकृतपणे सुरू झाली आहेत. MINI ने बुकिंग अमाऊंट अद्याप जाहीर केलेले नाही, मात्र ग्राहक Mini India च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा जवळच्या डीलरशिपमार्फत बुकिंग करू शकतात. नवीन Convertible मॉडेल Cooper S हॅचबॅक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि यात इलेक्ट्रिक सॉफ्ट-टॉप रूफ देण्यात आले आहे, जे फक्त 18 सेकंदात पूर्णपणे उघडते किंवा बंद होते. विशेष म्हणजे हे रूफ 30kmph वेगावरसुद्धा ऑपरेट करता येते.
डिझाईन आणि एक्स्टेरियर फीचर्स
सामोरच्या भागात गोल LED हेडलॅम्प्स, सर्क्युलर DRLs, ऑक्टागोनल ग्रिल तसेच ‘S’ बॅज आणि मोठे एअर डॅम्स दिले गेले आहेत. मागील बाजूस, हार्डटॉप मॉडेलप्रमाणे त्रिकोणी टेललॅम्प्सऐवजी Union Jack स्टाइलचे LED टेललॅम्प्स देण्यात आले आहेत. याशिवाय दुहेरी टोनचे बंपर्स, 17-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि बॉडी क्लॅडिंग यामुळे कारचा स्पोर्टी लूक आणखी खुलतो.
इंटीरियर आणि फीचर्स
केबिनमध्ये MINI ची पारंपरिक सर्क्युलर थीम कायम ठेवण्यात आली आहे. क्लीन ड्युअल-टोन केबिन, पिल-शेप एअर व्हेंट्स आणि कस्टमायझेबल सस्टेनेबल मटेरियल डॅशबोर्ड मिळतो. सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे 9.4-इंच OLED टचस्क्रीन, जेच ड्रायव्हर डिस्प्लेचेही काम करते. याशिवाय हेड-अप डिस्प्ले, Harman Kardon प्रीमियम साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, अॅम्बिएंट लाईटिंग, रियर व्ह्यू कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि पॉवर्ड सीट्स मिळतात.
हेही वाचा – रिक्षाला फक्त तीनच चाकं का असतात?
इंजिन आणि परफॉर्मन्स
MINI Cooper Convertible मध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 204hp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. 7-स्पीड DCT गिअरबॉक्स सोबत येणारी ही कार 0-100kmph फक्त 6.9 सेकंदात स्प्रिंट करू शकते. हार्डटॉप व्हर्जनपेक्षा ही वेळ किंचित जास्त आहे, कारण कन्वर्टिबल चेसिसमध्ये अतिरिक्त मजबूती दिली जाते.
किंमत किती असेल?
या MINI Convertibles ची अंदाजित किंमत सुमारे ₹50 लाख (एक्स-शोरूम) अशी असण्याची शक्यता आहे. या सेगमेंटमध्ये याला थेट स्पर्धक नाही, तर Electric Folding Roof असणारी एकमेव पर्यायी कार MG Cyberster EV असून तिची किंमत ₹75 लाखांपासून सुरू होते.