भारताच्या टॉप 5 ‘सेफेस्ट’ कार! Global NCAP ने जाहीर केली सर्वात सुरक्षित गाड्यांची नवी यादी

Safest Cars In India : भारतामध्ये कार खरेदी करताना सुरक्षितता हा आज सर्वात महत्त्वाचा घटक ठरत आहे. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांचा कल ‘सेफ कार’ कडे झपाट्याने वळला आहे. Global NCAP सारख्या आंतरराष्ट्रीय क्रॅश टेस्टिंग संस्थेने जाहीर केलेल्या रेटिंग्सनुसार अनेक भारतीय कार आता जागतिक पातळीवर सुरक्षिततेच्या कसोटीत अग्रेसर ठरताना दिसत आहेत. अलीकडील चाचण्यांच्या आधारे India’s … Read more

भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही, 24+ किमी प्रति लिटर मायलेज, 5-स्टार सुरक्षा, 360-डिग्री कॅमेरा आणि बरंच काही…

Tata Nexon

Best Selling SUV India 2025 :  भारताची सर्वाधिक विकली जाणारी SUV कोणती? नाव ऐकून तुम्ही चकित व्हाल! कारण ही गाडी क्रेटा, थार किंवा पंच नाही… तर टाटा नेक्सॉनने ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय ऑटो बाजारात इतिहास रचला आहे. विक्रमी विक्रीचा टप्पा ऑक्टोबर 2025 महिन्यात टाटा नेक्सॉनने 22,083 युनिट्स (ICE+EV) विक्री करत संपूर्ण देशात सर्वाधिक विकली जाणारी … Read more

भारतात MINI Cooper Convertible बुकिंग्स सुरू! फक्त 18 सेकंदात छत उघडणार, किंमत…

MINI Cooper Convertible India

MINI Cooper Convertible India : भारतामध्ये MINI Cooper Convertible ची बुकिंग्स अधिकृतपणे सुरू झाली आहेत. MINI ने बुकिंग अमाऊंट अद्याप जाहीर केलेले नाही, मात्र ग्राहक Mini India च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा जवळच्या डीलरशिपमार्फत बुकिंग करू शकतात. नवीन Convertible मॉडेल Cooper S हॅचबॅक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि यात इलेक्ट्रिक सॉफ्ट-टॉप रूफ देण्यात आले आहे, जे फक्त … Read more

20 वर्षांहून जुन्या गाड्यांना तगडा फटका! फिटनेस फी 2500 वरून थेट 25,000!

vehicle fitness fee hike

Vehicle Fitness Fee Hike : देशभरातील वाहनमालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) वाहन फिटनेस चाचणीच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पूर्वी 15 वर्षांनंतर वाढीव फिटनेस फी लागू होत होती, मात्र आता ही मर्यादा थेट 10 वर्षांवर आणण्यात आली आहे. सुधारित Central Motor Vehicle Rules (Fifth Amendment) तात्काळ … Read more

भारताचा पहिला ‘स्मार्ट टायर’ बाजारात; आता हवा कमी झाली की टायर स्वतः बोलेल, “भाई, भरून घे!”

JK Smart Tyre

JK Smart Tyre : भारतामध्ये वाहन सुरक्षेच्या जगात एक मोठी क्रांती घडली आहे. सुप्रसिद्ध जेके टायरने देशाचा पहिला ‘स्मार्ट टायर’ (Smart Tyre) लाँच करत ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये नवा अध्याय लिहिला आहे. आता तुमची कार स्मार्ट असेलच… पण तिचे टायर्सही तुमच्याशी ‘बोलणार’ आहेत! हवा कमी झाली, तापमान वाढले किंवा लीक सुरू झाले की टायर लगेचच ड्रायव्हरला अलर्ट … Read more

फक्त इन्शुरन्स काढू नका, ‘ही’ गोष्ट करा, मिळेल ऑन-रोड किंमतीइतका क्लेम!

Car Insurance

Car Insurance : तुम्ही नवीन गाडी घेतली आहे आणि तिचं इन्शुरन्सही काढलं आहे. त्यामुळे तुम्ही निवांत असता, काही होवो, विमा कंपनी सगळं नुकसान भरून देईल! पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे. कारण बहुतांश केसमध्ये तुम्हाला पूर्ण रक्कम मिळत नाही. विमा कंपनी फक्त डेप्रिसिएटेड व्हॅल्यू म्हणजे कमी झालेल्या बाजारमूल्यानुसारच क्लेम देते. पण जर अशी एक पॉलिसी … Read more

आरारारा खतरनाक..! टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला टाटा मोटर्सकडून सरप्राईज गिफ्ट!

Tata Sierra To Team India

Tata Sierra To Team India : भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडेच जागतिक क्रिकेट विश्वचषक जिंकत देशाचं नाव जगभर उज्ज्वल केलं. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाचा गौरव करण्यासाठी टाटा मोटर्सने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या दिग्गज SUV Tata Sierra चा पहिला ताफा टीमच्या सर्व सदस्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. टीममधील प्रत्येक खेळाडूला टॉप-एंड व्हेरिएंट भेट … Read more

Suzuki Fronx ला 5-Star Safety! ASEAN NCAP Crash Test मध्ये कमाल

Maruti Suzuki Fronx

Maruti Suzuki Fronx : भारतात लाँच झाल्यापासून Maruti Suzuki Fronx ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV पैकी एक ठरली आहे. आकर्षक डिझाइन, किफायतशीर किंमत, उत्कृष्ट मायलेज, मारुतीची विश्वासार्ह सेवा आणि फीचर्समुळे ही गाडी भारतीयांच्या मनात घर करून बसली आहे. पण, ग्राहकांच्या मनात एकच प्रश्न कायम होता—Fronx ची क्रॅश टेस्ट रेटिंग काय? भारतामध्ये अजूनपर्यंत हिची … Read more

बंगळुरूच्या रस्त्यावर धावली ‘ड्रायव्हरलेस कार’! व्हिडिओ व्हायरल; देशात ऑटोमेटेड वाहन तंत्रज्ञानाकडे नवा टप्पा

Driverless Car India Viral Video

Driverless Car India Viral Video : बंगळुरूच्या आर.व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये एक स्वयंचलित, चालकविरहित (Driverless) कार फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. खास म्हणजे, या कारमध्ये उत्तरादी मठाचे श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी स्वतः बसून ट्रायल राइड घेताना दिसत आहेत. हा अनोखा प्रसंग पाहून नेटिझन्समध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या व्हिडिओमध्ये कार पूर्णपणे … Read more

Video : चार वर्षांनंतर Duster चे कमबॅक, कंपनीने केली घोषणा, जबरदस्त लूक!

Renault Duster 2026

Renault Duster 2026 : रेनॉल्ट इंडियाने अखेर आपल्या सर्वाधिक लोकप्रिय SUV ‘डस्टर’च्या कमबॅकची अधिकृत घोषणा केली आहे. 4 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नवी जनरेशन डस्टर भारतात 26 जानेवारी 2026, म्हणजेच गणतंत्र दिनी धडकणार आहे. ही घोषणा कंपनीने नुकताच जारी केलेल्या अधिकृत टीझर व्हिडिओत केली असून, त्यामुळे SUV चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 2012 मध्ये पहिल्यांदा भारतीय … Read more